
मित्रानेच काढला मित्राचा काटा, तोंड दाबून केली युवकाची हत्या, मलकापूर शहरातील घटना
मलकापूर :- शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील मोकळ्या मैदानात बुधवारी, १५ जानेवारी रोजी रात्री उशिरा प्रविण अजाबराव संबारे (वय २७, रा. बेलाड, ता. मलकापूर) या युवकाची तोंड दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रविणचा भाऊ सचिन अजाबराव संबारे (वय ३२) याने पोलिसांत तक्रार दिली असून वैभव गोपाल सोनार (वय २१, रा. तरोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव…