नूतन विद्यालयातील दोन शिक्षक निलंबित — गंभीर गुन्ह्यात अटकेनंतर शिक्षण विभागाची तातडीची कारवाई

मलकापूर::- शिक्षण क्षेत्रातील जबाबदारीच्या भूमिकेत असताना अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग आल्यास कायदेशीर कार्यवाही अटळ ठरते, याचे उदाहरण मलकापूरच्या नूतन माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. समाधान आत्माराम इंगळे व श्री. अनिल नीना थाटे या दोघांना एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात…

Read More

डासाळा येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या; कर्जबाजारीपणा व मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज

उदयनगर : – येथून काही अंतरावर असलेल्या डासाळा येथे ३८ वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३० एप्रिल) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, डासाळा येथील योगेश गणेश मते (वय ३८ वर्षे) यांनी आपल्या शेतात जाऊन नायलॉन दोरीच्या साह्याने टिन शेडवरील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके…

Read More

घरफोडी करणाऱ्या दोघांविरुद्ध शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल!

शेगाव : – घरात कुणी नसल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी रविंद्र आनंदराव मुरुमकर (वय ३९, रा. गौलखेड रोड, पवारवाडी, शेगाव) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केलं की, ते २४ एप्रिल रोजी…

Read More

आईच्या अश्रूंना शेवटी मुलाने दिलं उत्तर; दारुड्या पित्याच्या अमानुष त्रासाचा घेतला जीवघेणा बदला, खामगाव तालुक्यातील घटना!

खामगाव : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) “आई रोज रडायची… बापाच्या शिव्या-माराच्या धिंगाण्याला कंटाळून तिने खूपदा जग सोडायची तयारी केली होती… पण एकुलत्या एक मुलाने तिचे अश्रू पाहिले आणि शेवटी वडिलांचाच जीव घेतला.” लोणी गुरव (ता. खामगाव) येथे २९ एप्रिलच्या रात्री घडलेली ही धक्कादायक घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. गोरख धोंडोपंत हिवराळे…

Read More

“आम्ही फ्लॅट खाली करणार नाही, जर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या नवऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू; जातीवाचक शिवीगाळ व धमकी प्रकरणी महिलेसह एका विरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर: मालमत्तेच्या वादातून वैयक्तिक राग व्यक्त करत एक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मलकापूर शहरात उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता, संबंधित महिलेला तिच्या पतीविरुद्ध खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी महिला व एका अनोळखी व्यक्तीवर अ‍ॅट्रासिटीसह गंभीर गुन्हे दाखल करण्यात…

Read More

अवैध बांधकामावर कारवाई न झाल्यामुळे ‘घागर पुंजून’ न.प.च्या चालढकलीचा निषेध! शांती आरोग्यम् हॉस्पिटल प्रकरण — प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन चर्चेत

मलकापूर :- शांती आरोग्यम् हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर चार महिन्यांपासून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अखेर आज अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टप यांनी नगर परिषद कार्यालयासमोर घागर पुंजून निषेध आंदोलन छेडले. ‘चालढकल’ धोरण स्वीकारून अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या न.प. प्रशासनाचा त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. या अनोख्या आंदोलनाची शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली. दि. २७…

Read More

समृद्धी महामार्गावर झोप लागून अपघात : १ ठार, १ गंभीर

दुसरबीड :- मध्यरात्री दुसरबीड टोलनाक्याजवळ समृद्धी महामार्गावर आयशर वाहन (MH-20-EG-5075) झोप लागल्याने अपघात झाला. चालक गणेश गायकवाड (४०, संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहप्रवासी मच्छिंद्र क्षीरसागर गंभीर जखमी झाले. आयशरने महामार्गावरील लोखंडी पोलला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच १०८ अॅम्बुलन्स व महामार्ग यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सिदंखेडराजा येथे…

Read More

भेंडवडमध्ये उद्या अक्षय तृतीयेची पारंपरिक घटमांडणी; साडेतीनशे वर्षांची परंपरा; वर्षभराच्या पावसाळी, कृषी व राजकीय घडामोडींवरील भाकितांची उत्सुकता

  भेंडवळ (ता. जळगाव जा : – तालुक्यातील भेंडवळ येथे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आणि शेतकरी, राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरणारी अक्षय तृतीयेची घटमांडणी ३० एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे. यामध्ये वर्षभरात होणाऱ्या पर्जन्यमान, पीक स्थिती, देशातील संरक्षण व राजकीय घडामोडी याबाबत अंदाज वर्तवला जातो. संपूर्ण प्रथेची सुरुवात श्री चंद्रभान महाराज वाघ यांनी केली…

Read More

रस्ता ओलांडतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघूड येथील महिलेचा मृत्यू; हायवे क्र. 53 वरील घटना

मलकापूर– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वाघुड पुलाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मथुराबाई गोपाळ हिंगणकर (वय ५०), रा. मौजे वाघुड या सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी…

Read More

गुरुचरित्र पारायणाने निर्माण केली भक्तिभावाची ऊर्जा; राउतवाडी केंद्रात ४६५ सेवेकऱ्यांचा सामूहिक सहभाग

बुलढाणा :- धर्म, श्रद्धा आणि भक्तीच्या संगमातून समाजात सकारात्मकतेचा नवा झरा फुलवणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढवणाऱ्या अशा एकत्रित उपक्रमांमुळे समाजामध्ये प्रेम, एकोपा आणि भक्तिभाव दृढ होतो. याच भावनेतून बुलढाणा शहरातील राउतवाडी केंद्रात नुकताच गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात ४६५ सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले….

Read More
error: Content is protected !!