
वाकोडीत एसएमएसद्वारे पाणीपुरवठ्याची पूर्वसूचना, शहरातील नागरिक मात्र अंधारात; नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल!
मलकापूर ( उमेश ईटणारे ): – शहरातील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम असून नागरिकांना पाणीपुरवठा कधी होईल याची कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे अनेक नागरिकांचे पाणी भरणे राहून जाते. याउलट, अगदी जवळ असलेल्या वाकोडी ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन करून नागरिकांसाठी सोयीस्कर पद्धतीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. वाकोडी ग्रामपंचायतीचा नियोजनबद्ध पाणीपुरवठा वाकोडी ग्रामपंचायत नियमित चार दिवसांवर पाणीपुरवठा करते आणि पाणी…