खरबुज चोरीप्रकरणी दोघांना अटक ढोरपगाव शिवारातील घटना; चोरट्यांकडून ८ हजारांचे खरबुज व दुचाकी जप्त
पिंपळगाव राजा : ढोरपगाव शिवारात खरबुज चोरीसाठी आलेल्या दोघा चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांकडून सुमारे ८ हजार रुपये किमतीचे १५० ते १६० किलो खरबुज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. ४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. आरोपी अमन दीपक लोखंडे आणि प्रेम दादाराव इंगळे, दोघेही रा. भालेगाव बाजार,…
