धुपेश्वर खून प्रकरणातील चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी; नऊ आरोपींवर गुन्हा दाखल; चार अटक तर पाच फरार
मलकापूर / धुपेश्वर :- धुपेश्वर येथे किरकोळ वादातून धारदार हत्याराने तरुणाचा खून व एक जण गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धुपेश्वर मंदिराजवळ घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी…
