Headlines

मयुरी ठोसर ताईस न्याय मिळावा या मागणी साठी मलकापूर सोनार समाज धडकला तहसील कार्यालयावर; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

मलकापूर – जळगाव जिल्ह्यातील सुंदर मोती नगर येथे अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या २३ वर्षीय उच्चशिक्षित मयुरी गौरव ठोसर हिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे समाजमन सुन्न झाले असून, तिची आत्महत्या नसून सासरच्यांनी केलेली हत्या असल्याचा ठाम आरोप करण्यात आला आहे. माळवी सोनार समाज, मलकापूर यांच्यावतीने मुख्यमंत्री तथा…

Read More

बुद्धिबळ स्पर्धेत नूतन इंग्लिश स्कूल विभागीय स्तरावर

मलकापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा व बुद्धिबळ सारख्या बौद्धिक खेळांची चढाओढ वाढत चालली आहे. अशाच स्पर्धात्मक वातावरणात मलकापूर येथील नूतन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी प्रांजल राजेश जामोदे हिने आपली गुणवत्ता सिद्ध करत जिल्हास्तरावर यश मिळवले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा…

Read More

घिर्णी शेतकऱ्यांचे तहसीलदारांकडे निवेदन; जुनी नाली बंद केल्याने पिकांचे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी

मलकापूर : घिर्णी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार मलकापूर यांना निवेदन देत शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली नैसर्गिक पाण्याची नाली बंद करण्यात आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. सदर प्रकरणी प्रत्यक्ष घटनास्थळ चौकशी करून नुकसानभरपाई मिळावी व संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनकर्ता भागवत जनार्दन बोपले व इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात…

Read More

पावसाला न जुमानता दुर्गा देवी मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह, डीजे वादामुळे रंगात भंग; ९ डीजे चालकांवर कारवाई

मलकापूर (प्रतिनिधी – दिपक इटणारे) : धुवाधार पावसाच्या सरींमध्येही मलकापूर शहरात दुर्गा देवीची मिरवणूक उत्साहात पार पडली. लेझीमच्या तालावर पारंपरिक वादनाने भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे शांततेचा भंग झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांचा देखावा विशेष आकर्षण ठरला. सायंकाळी सातच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला. पावसाचे धुवाधार थेंब झेलूनही…

Read More

प्रेमाची कहाणी रक्तरंजित शेवटी संपली; साखरखेर्डाच्या प्रेमीयुगुलांचा दुर्दैवी अंत खामगावात हत्याकांड!

खामगाव ( दिपक इटणारे ):- प्रेमाचा शेवट इतका भीषण असेल, याची कुणालाच कल्पना नव्हती…! प्रेमकहाणीचा गोडवा एका क्षणात रक्तरंजित वळणावर जाऊन संपला. दोन हृदयं, जी एकमेकांसाठी धडधडत होती, तीच अखेरच्या क्षणी एकमेकांच्या विरुद्ध उभी ठाकली. खामगाव शहराला हादरवणारी ही थरारक घटना घडली जुगनू हॉटेलमध्ये. साखरखेर्डा परिसरातील प्रियकर–प्रेयसीच्या या नात्याचा शेवट चाकूच्या वारात झाला. ऋतूजा पद्माकर…

Read More

नांदुरा-मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

  मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) नांदुरा-मलकापूर तालुक्यात दि. 15 व 16 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना, करणी सेना आणि युवा भीम सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, काही मंडळातील पर्जन्यमापन यंत्रे खराब असल्याने खरी पावसाची नोंद कमी…

Read More

धोबी समाजाच्या आरक्षणासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन!

मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) धोबी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरातून एकच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत गाडगे महाराज धोबी परीट सेवा मंडळ, मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. धोबी समाजावर आरक्षणाच्या बाबतीत होणारा अन्याय तातडीने दूर करून समाजाला न्याय द्यावा ही मागणी यावेळी करण्यात आली….

Read More

नूतन इंग्लिश स्कूलचा क्रिकेट संघ तालुक्यात अव्वल

मलकापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल येथे १४ वर्षाखालील तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा मुलांसाठी पार पडल्या. या स्पर्धेत विविध शाळांचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूरचा क्रिकेट संघ तिन्ही…

Read More

मिशन वात्सल्य समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून सौ.कोमलताई सचिन तायडे यांची निवड

मलकापूर : एकल/विधवा महिलांच्या जीवनात पुन:श्च आनंद निर्माण व्हावा, त्यांनी स्वावलंबी बनावे व स्वत:च्या पायावर उभे रहावे याकरीता गेल्या काही वर्षांपासून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविणार्‍या एस.के.स्वेअरच्या एन्टरप्रायजेस संचालिका व जनक्रांती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.कोमल सचिन तायडे यांची निवड बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांनी मिशन वात्सल्य…

Read More

बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ५० मुली एका महिन्यात बेपत्ता; पालकांनी लक्ष देण्याची गरज

बुलढाणा ( दिपक इटणारे ): बुलढाणा जिल्ह्यात मुली बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ५० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून या मुली हरवल्याचे स्पष्ट होत असून, काही मुली घरगुती कारणामुळे, काही रागाच्या भरात, तर काही विवाहासंदर्भात घर सोडून गेल्याची नोंद करण्यात आली…

Read More
error: Content is protected !!