
“डॉनगिरीचा शेवट!” — मलकापूरमध्ये तलवारीच्या वाढदिवसाचा दहशती नाट्याला ‘गिरी स्टाईल’चा Full Stop! कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या वेगवान कारवाईने दहशतीचा मुखवटा फाडला; आरिफ डॉन ची काढली शहरात धिंड
मलकापूर ( दिपक इटणारे )मलकापूर शहरात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी कायदा, शिस्त आणि पोलिसांची भीती झुगारून खुलेआम दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ‘आरिफ डॉन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युवकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापत गुंडगिरीचं प्रदर्शन केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तो हातात तलवार घेऊन उभा असलेला, गराड्यात तरुणांची…