
सावरगाव मार्गावर मलकापूरच्या ऑटो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले; ६२०० रुपयांचा ऐवज लंपास! धामणगाव बढे पोस्टेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!
धामणगाव बढे : – दुचाकीवर आलेल्या दोघांनी ऑटोचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ६,२०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना सोमवार, ८ एप्रिल रोजी पहाटे सावरगाव मार्गावर घडली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास नारायण जैस्वाल (रा. शिवाजीनगर, मलकापूर) हे प्रवासी घेऊन ऑटोरिक्षाने सावरगावकडे जात…