
हात पकडून महिलेची छेडछाड; विरोध करणाऱ्या जेठाला फायटरने मारहाण, मोताळा तालुक्यातील घटना!
मोताळा : – तालुक्यातील एका गावात ३८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली. महिलेला एकटी पाहून ३२ वर्षीय प्रविण घोरपडे याने तिचा हात पकडत छेडछाड केली. महिलेच्या जेठाने हा प्रकार पाहून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने फायटरने हल्ला करून जेठाच्या नाक, ओठ आणि गालाला जखमी केले. शिवाय, घटनेबाबत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली….