Headlines

मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावात धाडसी चोरी, एकाच रात्री तीन ते चार घरे फोडली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मलकापूर :- शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावात एका रात्रीत तीन ते चार घरफोडीच्या घटना घडल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. रविवारी मध्यरात्री १:३० ते २:३० या वेळेत या घटना घडल्या. चोरांनी टप्प्याटप्प्याने घरफोड्या करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, कपडे आणि इतर मौल्यवान…

Read More

बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, शेगाव येथील घटना!

शेगाव: – येथील बसस्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात राहुल वामनराव इंगळे (वय ४३, रा. चिंचोली) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. नातेवाईक व स्थानिकांनी शोध घेऊनही…

Read More

योग्य नियोजनाची कमतरता म्हणूनच ‘कॉपीमुक्त अभियान’ आवश्यक; परीक्षा केंद्रांवर भरारी पथके धाडून ‘कॉपीमुक्ती’चे श्रेय लाटण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

मलकापूर: ( दिपक इटणारे ) सध्या संपूर्ण राज्यात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असून, शासन आणि प्रशासनाच्या वतीने परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. विविध विभागांच्या भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धडक मोहीम राबवली असून, कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. परीक्षा काळात धाडी – विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही दबावात!…

Read More

घरात शिरलेल्या सापाचा बहीण भावावर हल्ला.. बहिणीचा मृत्यू; भावावर उपचार सुरू!

जालना : – अंबड शहरालगतच्या म्हाडा कॉलनीत शनिवारी (1 मार्च) पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सापाच्या दंशाने 8 वर्षीय श्रध्दा मनोहर खरात हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिचा 14 वर्षीय भाऊ मकरंद खरात जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोहर खरात हे आपल्या पत्नी, आई आणि पाच मुलांसह पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. अपुऱ्या जागेमुळे कुटुंबातील काही…

Read More

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलीस कर्मचाऱ्याचा त्रास असह्य झाल्याने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

खामगाव – वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या तयारीत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. प्रसन्न वानखडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. अकोल्यातील आकाशवाणी परिसरात स्थित जलाराम सोसायटी येथे तो आपल्या भावाच्या खोलीत राहत होता. तेथे गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी…

Read More

धावत्या टाटा मॅजिकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही; रोहिणखेड येथील घटना

रोहणखेड – सुलतानपूर येथून रोहिणखेडकडे साड्या खरेदीसाठी निघालेल्या टाटा मॅजिक वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. रोहिणखेडनजीक पाण्याच्या टाकीजवळ ही घटना शनिवार, 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता घडली. वाहनचालक शेख इकबाल शेख हसन हे त्यांच्या मालकीच्या टाटा मॅजिक (MH-17-BX-3283) या वाहनासह जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून त्वरित गाडी थांबवली व…

Read More

वाकोडीत एसएमएसद्वारे पाणीपुरवठ्याची पूर्वसूचना, शहरातील नागरिक मात्र अंधारात; नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल!

मलकापूर ( उमेश ईटणारे ): – शहरातील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम असून नागरिकांना पाणीपुरवठा कधी होईल याची कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे अनेक नागरिकांचे पाणी भरणे राहून जाते. याउलट, अगदी जवळ असलेल्या वाकोडी ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन करून नागरिकांसाठी सोयीस्कर पद्धतीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. वाकोडी ग्रामपंचायतीचा नियोजनबद्ध पाणीपुरवठा वाकोडी ग्रामपंचायत नियमित चार दिवसांवर पाणीपुरवठा करते आणि पाणी…

Read More

मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी, शेगाव येथील घटना!

  शेगाव : – महादेव मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लुटल्याची घटना घडली आहे. दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील साखळी हिसकावून पळ काढल्याने परिसरात घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवकी नगर येथील रहिवासी सौ. चैताली गजानन सोनुने (वय ३२) या महिलेने महादेव मंदिरात दर्शन घेतले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्या घरी परतत असताना…

Read More

विद्युत धक्क्याने सहाय्यकाचा मृत्यू, गुन्हा दाखल; मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा:- तालुक्यातील बोरखेडी येथे विद्युत दुरुस्ती करताना शेतात विजेचा धक्का बसून एका विद्युत सहाय्यकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव हनुमान चव्हाण (वय ४९) असे असून, ते विद्युत महावितरण कंपनीत सहाय्यक…

Read More

चाकूचा धाक दाखवून चैन हिसकावणाऱ्या दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी, मलकापूर शहरात घडली होती घटना!

  मलकापूर:- शहरातील रेल्वे स्टेशनजवळ २४ फेब्रुवारी रोजी चाकूचा धाक दाखवून ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुरुषोत्तम विष्णू कुटे (रा. पोटा, ता. नांदुरा) हा युवक पेट्रोल पंपाजवळून जात असताना दोन व्यक्तींनी त्याला अडवून चाकूचा धाक दाखवला आणि…

Read More
error: Content is protected !!