
मलकापूर-खामगाव परिसरात अवैध दारू विक्रीला उत; उत्पादन शुल्क विभाग मूग गिळून गप्प
मलकापूर:- मलकापूर आणि खामगाव परिसरातील ढाबे, पानटपऱ्या, अंडा-ऑम्लेट सेंटर आणि चिकन सेंटरवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी खुलेआम देशी-विदेशी दारू व बिअर विक्री होत असून, यामुळे शासनाच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे ही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून,…