
शिवसेना (उ.बा.ठा) मलकापूर शाखेची मागणी – शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व महिलांना २१०० रुपये अनुदान द्या
मलकापूर: महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मलकापूर शहर व तालुका शाखेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महायुती सरकारने सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सरकारने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी…