Headlines

उमाळी-वरखेड रस्त्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी!

  मलकापूर :- तालुक्यातील उमाळी-वरखेड रस्त्यावर 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अरुण राजाराम तडके (55, वरखेड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरजपाल सुभाषसिंह राजपूत (34) आणि अर्जुन मानसिंह राजपूत (17, उमाळी) गंभीर जखमी झाले. अरुण तडके हे MH 28 AA 7652 क्रमांकाच्या…

Read More

हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ; पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव येथील घटना!

शेगाव – हुंड्याच्या पैशावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या प्रकरणी तिच्या पतीसह नणंदांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी संगनमत करून तिला माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची सक्ती केली. यास नकार दिल्याने तिचा छळ करण्यात आला व तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. फिर्यादी सौ. मेघा…

Read More

मलकापूर येथे माता रमाई यांची जयंती साजरी

मलकापूर :- स्थानिक रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे माता रमाई यांची १२७वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष अजय सावळे तर प्रमुख उपस्थित मध्ये मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते माता रमाईंना अभिवादन करण्यात…

Read More

संत्राच्या बागेत नेऊन साडेचार वर्ष्याच्या चिमुकली सोबत नको ते केल, आरोपीला अटक; सोनाळा येथील घटना!

  सोनाळा (टूनकी) :- शिवारातील एका संत्रा बागेत ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता साडेचार वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचे वडील हे शेतात रखवालदार म्हणून कार्यरत आहेत. याच दरम्यान मध्यप्रदेशातील डोईफोडीया येथील २१ वर्षीय सुनिल कालूसिंग निगवाले…

Read More

शेगाव स्थानकात नवजीवन एक्सप्रेसमध्ये अनोळखी वृद्ध महिलेचा आढळला मृतदेह, रेल्वे पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

  शेगाव :- नवजीवन एक्सप्रेस (गाडी क्र. 12655) च्या जनरल डब्यात एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. अकोला दिशेने जाणाऱ्या या गाडीत शेगाव रेल्वे स्थानकावर तपासणी दरम्यान हा मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला अंदाजे 60 वर्षांची असून तिची उंची 5 फूट 5…

Read More

भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू; चिखली येथील घटना!

  चिखली:- शहरात भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. गीता अनिल सोळंकी (३८, रा. हरिओमनगर) या आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घराकडे जात होत्या. घराजवळ पोहोचत असताना उजवीकडे वळत असताना पाठीमागून येणाऱ्या बोलेरोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गीता सोळंकी रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर…

Read More

१७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून छळ; युवकावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, खामगाव शहरातील घटना!

  खामगाव – शहरातील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या १९ वर्षीय युवकावर पोलिसांनी विनयभंग आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित विद्यार्थिनी शहरातील एका शाळेत दहावीत शिक्षण घेत असून, गेल्या वर्षभरापासून प्रथमेश प्रभाकर चितोळे (वय १९, रा. सुटाळा बुद्रुक) हा तिचा सतत पाठलाग करीत होता. अखेर ४ फेब्रुवारी रोजी संत…

Read More

अज्ञात टिप्परच्या धडकेत तरुण ठा-र; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : मुक्ताईनगर रोडवर भरधाव अज्ञात टिप्परने एका तरुणाला चिरडल्याने तो जागीच ठा-र झाला. ही घटना मलकापूर तहसील कार्यालयाजवळ, जिल्हा परिषद शाळेसमोर ४ फेब्रुवारी रात्री १० वाजता घडली. मृत तरुणाचे नाव प्रवीण श्रीराम फुंदे (वय ३२, रा. कुंड बुद्रुक, ता. मलकापूर) असे आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, छत्रपती शिवाजी नगरकडून तहसील चौकाकडे भरधाव वेगाने वाळूने भरलेले टिप्पर येत…

Read More

कंटेनर – आयशरचा समोरासमोर भीषण अपघात – चार जण गंभीर जखमी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील घटना!

  मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नांदुरा रोडवरील पुलाजवळ १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कंटेनर आणि आयशर यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक व वाहक असे चार जण गंभीर जखमी झाले. अपघातात सुलेमान शहा (३०, रा. अजमेर), नाझीर बेग (३०, रा. अजमेर), अस्लम शहा (३५,…

Read More

कुंभमेळ्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन!

  बुलढाणा – उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने जाहीर केलेले हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – प्रयागराज कंट्रोल रूम: टोल-फ्री क्रमांक १९२०, दुरध्वनी क्रमांक ०५२२-२२३७५१५ मंत्रालय नियंत्रण कक्ष: ०२२-२२०२७९९०…

Read More
error: Content is protected !!