Headlines

भरधाव मालवाहू वाहनाची स्कुटीला धडक; स्कुटीस्वार युवती ठार, आई गंभीर जखमी, बुलढाणा येथील घटना!

  बुलडाणा : – भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू वाहनाच्या धडकेत स्कुटीस्वार युवतीचा मृत्यू झाला, तर तिची आई गंभीर जखमी झाली. हा हृदयद्रावक अपघात बुलडाणा–चिखली राज्य मार्गावरील त्रीशरण चौकात सायंकाळी घडला. मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल संदीप चौधरी (वय २४) आणि तिची आई छाया संदीप चौधरी (वय ५५) स्कुटीवरून चिखली मार्गे डाक विभाग कार्यालयाकडे जात होत्या. दरम्यान, मागून…

Read More

पाकिस्तानमध्ये गीता-शिवपुराण प्रवचन करणारे पं. विजयशंकर मेहता मलकापूरमध्ये

मलकापूर: स्थानिक मलकापूर शहरातील धार्मिक आणि सामाजिक वातावरण अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने श्री सदविचार सेवा समिती, मलकापूर यांच्या वतीने त्यांच्या स्थापनाच्या रजत महोत्सवानिमित्त भव्य आणि दिव्य अशा श्री शिव पुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणात रंगून जाणार आहे. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२५…

Read More

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणांना भरधाव बसची धडक; एक ठार, दुसरा गंभीर जखमी, चिखली-बुलढाणा मार्गावरील सवणा फाट्याजवळील घटना!

  चिखली :- चिखली-बुलढाणा मार्गावरील सवणा फाट्याजवळ भीषण अपघातात एक तरुण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात आलोक श्यामलाल शिंगणे (३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय रमेश पट्टे (२६) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर चिखलीतील एका खासगी…

Read More

दारूच्या नशेत मुलाने आईला जिवंत पेटविले, आरोपी अटकेत; संग्रामपूर तालुक्यातील घटना!

  संग्रामपूर (दि. ९) – दारूच्या नशेत स्वतःच्या आईला जिवंत पेटविल्याची धक्कादायक घटना पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथे घडली. गौरव देशमुख याने ‘तू घातलेली साडी मला हवी’ म्हणत आई मीनाबाई यांच्या कपड्यांना आग लावली. यात त्यांचे पाय व तळपाय भाजले असून त्यांच्यावर शेगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी…

Read More

समृद्धी महामार्गावर एकाच रात्रीत तीन अपघात, वेगवेगळ्या अपघातात १५ जखमी!

दुसरबीड : – समृद्धी महामार्गावर काल शनिवारी रोजी रात्री तीन अपघात घडले, यात १५ जण जखमी झाले. पहिला अपघात नागपूर कॉरिडोरवर (चॅनल ३०२) कारचे टायर फुटल्याने झाला. दुसरा अपघात (चॅनल ३१०) टिप्पर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने इको कारला झाला. तिसरा अपघात (चॅनल ३१३.१) इर्टिगा कार ट्रकवर आदळल्याने झाला. सर्व जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बु. येथील घटना!

मलकापूर :- तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक शिवारात ८ फेब्रुवारीच्या रात्री १०:३० वाजताच्या सुमारास दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ४४ वर्षीय आनंद पांडुरंग ठोसर यांचा मृत्यू झाला. बारादरी (मलकापूर) येथील रहिवासी आनंद ठोसर हे दुचाकीवरून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ…

Read More

घरगुती वादातून पतीचा-पत्नीवर ब्लेडने हल्ला, भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल!

भुसावळ – कौटुंबिक वादाचे गंभीर रूप घेत पतीने पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पंचशील नगर येथे घडली. या हल्ल्यात विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पंचशील नगर येथे शबनम बी वसीम शहा (वय २१) या तरुणीवर तिचा पती वसीम शहा बरकत शहा याने हल्ला केला. दोघांमध्ये…

Read More

भरधाव दुचाकीची सायकलस्वाराला जोरदार धडक, सायकल स्वाराचा मृत्यू, दुचाकी चालक गंभीर जखमी; मलकापूर शहरातील मुक्ताईनगर रोडवरील घटना

मलकापूर : – मलकापूर येथील मुक्ताईनगर मार्गावर रात्री झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेख गफ्फार शेख रहीम (वय ५५, रा. मलकापूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते जीएस गोल्ड कंपनीत वॉचमन म्हणून कार्यरत होते. शुक्रवार, ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास ते ड्युटीवरून सायकलने घरी जात असताना, समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने (क्रमांक…

Read More

खामगाव-बाळापूर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खामगाव: अपघातांच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक दुर्दैवी घटना आज (8 फेब्रुवारी) दुपारी घडली. बाळापूर-खामगाव महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये संतोष शर्मा (रा. अकोला) यांचा जागीच मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, संतोष शर्मा एमएच 28-बीएस 2240 या क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. अपघात कशामुळे झाला याची स्पष्ट माहिती मिळालेली नाही, परंतु त्यांच्या डोक्यावरून वाहन गेल्याने…

Read More

चोरटे भले हुशार; खिडकीतून घरात प्रवेश केला अन ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला.. शेगाव तालुक्यातील वरुड येथील घटना!

  खामगाव: शेगाव तालुक्यातील वरूड येथे चोरट्यांनी घरफोडी करत ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषीकेश पंजाबराव कोकाटे यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातून त्यांनी मुख्य दरवाज्याची कडी तोडून कपाटातील रोकड, दागिने आणि दोन मोबाईल चोरले. चोरीस गेलेल्या मालामध्ये ५० हजार रुपये रोख, १५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि दोन…

Read More
error: Content is protected !!