Headlines

पोफळी येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याची उत्साहात तयारी..

  मोताळा: भक्तीमय वातावरणात पोफळी येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गावकरी आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा भक्तिरसात पार पडणार आहे. यंदा दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रींची आरती होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हाऊन…

Read More

कोलते इंजिनिअरिंगच्या एनएसएस शिबिराने ‘सात दिवस, सात संकल्प’ मोहिमेने धरणगावात केला सामाजिक सेवेचा महायज्ञ!

  मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष सात दिवशीय श्रम संस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले. दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 17 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जि. प. प्राथमिक मराठी शाळा धरणगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटनासाठी प्रमुख…

Read More

बारदाना गोदामाला आग, ३० लाखांचे नुकसान; खामगाव शहरातील घटना!

खामगाव: स्थानिक भडगुर्जी जिन भागातील पाडिया यांच्या बारदाना गोदामाला काल पहाटे अचानक आग लागल्याने अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. भडगुर्जी जिन भागात “अमेझर ट्रेडिंग कॉर्पोरेशन” या नावाने बारदान्याचे गोदाम आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच नगरपरिषद अग्निशमन दल…

Read More

श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी!

मलकापूर: श्रीसंत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १६ फेब्रुवारी रोजी विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकल माळवी सोनार समाज बांधवांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भक्तिभावाने सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संत नरहरी महाराजांच्या मंदिरातून वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य पालखी काढण्यात आली. पालखी सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. नंतर मंदिरात…

Read More

मलकापूर रेल्वे स्थानकावरील पार्किंगमधून प्राचार्याची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

  मलकापूर : – शहरातील रेल्वे स्थानक परिसरात पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना १० फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून, दुचाकीच्या मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. लि. भो. विद्यालयाचे प्राचार्य गिरीश वैद्य (वय ५८, रा. विद्युत नगर, घिर्णी रोड, मलकापूर) हे कामानिमित्त १० फेब्रुवारी रोजी रेल्वेने अमरावती येथे…

Read More

मलकापूर शहरात कॅफेत अल्पवयीन मुली सोबत जबरदस्ती, आरोपी फरार; कॅफेतील गैरप्रकार पोलीस रोखतील का?

मलकापूर :- शहरातील एका कॅफेमध्ये १२ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर मैत्री करून आरोपीने तिला कॅफेत बोलावले. त्यानंतर तिची बदनामी होईल असे कृत्य करत, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात समीर राजू देशमुख (रा….

Read More

गाईला मृत्यूच्या तावडीतून सोडवणारे डॉ भोळे व डॉ शेंबेकर ठरले देवदुत.. पोटात किमान 40 किलो प्लास्टिक अडकल्याने होती मृत्यूच्या दारात

मलकापूर :- शहरातील सारथी इंटरनॅशनल हॉटेल परिसरात एक गाय पोट फुगल्याने विव्हळत होती. गाईचा जीव मेटाकुळीस आला होता. अवघ्या काही मिनिटात यमदूत प्राण घेणारच तेवढ्यात देवदुत बनून आलेले पशु वैद्यकीय डॉक्टर भोळे व डॉक्टर शेंबेकर यांनी कर्तव्याची पराकाष्टा करून अखेर मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या मरत्या गाईला यमदुताच्या तावडीतून सोडवून नवीन जीवनदान दिले. याबाबत सविस्तर असे…

Read More

अज्ञात टिप्परच्या धडकेत ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू? कुटुंबीयांकडून अपघाताच्या कारणावर संशय; हिंगणकाजी मलकापूर रोडवर झाला होता अपघात!

मलकापूर : – हिंगणकाजी येथील ७८ वर्षीय हरिदास गोंडूजी फासे यांच्या मृत्यूबाबत नवा खुलासा समोर येत असून, त्यांचा मृत्यू दुचाकी घसरल्याने नव्हे, तर अज्ञात टिप्परच्या धडकेमुळे झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान, देवधाबा ते हिंगणकाजी मलकापूर रोडवर हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर रेती टाकल्याने…

Read More

धक्कादायक घटना; ‘सॉरी’ म्हणून पुढे गेल्यानंतर रिक्षा चालकाने केला पाठलाग; रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू!

( वृतसंस्था ) कर्नाटक ) बेळगाव : – रिक्षाला गाडी घासून गेल्यामुळे संतापलेल्या एका रिक्षा चालकाने बेदम मारहाण केल्यामुळे गोव्यातील माजी आमदार लहू मामलेदार (६९) यांचा बेळगावात मृत्यू झाला. रिक्षाला गाडीचा जरासा धक्का लागल्यामुळे मामलेदार यांनी सॉरी म्हटल्यावरही या रिक्षा चालकाने पाठलाग करून त्यांची गाडी अडवली आणि त्यांना मारहाण केली. त्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढताना खाली…

Read More

कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा भव्य रोजगार मेळावा!

मलकापूर – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर…

Read More
error: Content is protected !!