Headlines

मालमत्ता करा वरील मासिक शास्तीची धास्ती दूर करा – भाई अशांत वानखेडे

  मलकापूर : नगर परिषद मालमत्ता कर मुल्य निर्धारण चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्यामुळे अनेक वर्षापासुन मालमत्ता कर भरणा स्थगीत झालेला आहे. मालमत्ता करा वरील मासिक शास्त्री च्या धास्तीतून राज्य शासनाने मालमत्ता धारकांची सुटका करावी ! अशी मागणी एका पत्राद्वारे “समतेचे निळे वादळ” या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी केली आहे. याबाबत सविस्तर असे…

Read More

नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; ६० वर्षीय आरोपीला अटक; शेगांव तालुक्यातील धक्कादायक घटना!

  शेगाव – तालुक्यातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या ३७ वर्षीय आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी माणिकराव दामोधर (वय ६०) याने मुलीला पैशाचे प्रलोभन दाखवून आपल्या घरात नेले आणि खोलीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास…

Read More

अनोळखी इसमाचा फुटपाथवर आढळला मृतदेह, शेगाव येथील घटना

शेगाव: स्थानिक स्टेट बँकेजवळील फुटपाथवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. सदर घटना २० फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शहरातील अकोट रस्त्यावर राहणारे गजानन विश्वासराव साखरपांडे (वय ४३) हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे कार्य करतात. विशेषतः निराधार व भिकारी व्यक्तींना अन्नदान करण्याचे कार्य ते नियमितपणे करत असतात. दररोजप्रमाणे काल रात्री ९.३०…

Read More

दहावी परीक्षेसंदर्भात ठाणेदार संदीप काळे यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद – आत्मविश्वास आणि संयमाचा दिला मंत्र

  मलकापूर:- दहावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होताच तालुक्यातील डी.ई.एस. हायस्कूल, दाताळा येथे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी संवाद सत्र आयोजित करण्यात आले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी या विशेष सत्राद्वारे विद्यार्थ्यांना भयमुक्त, तणावरहित आणि आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे मार्गदर्शन केले. शालेय प्रशासनाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आत्मप्रेरणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. मार्गदर्शन करताना संदीप…

Read More

बुलढाणा जिल्ह्याच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र नेटबॉल संघात निवड

मलकापूर :- नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत २३ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हरियाणा (भिवणी) येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात ज्युनियर गटातील मुले व मुली खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. धुळे येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मलकापूर च्या ज्युनियर मुलीच्या…

Read More

कामावर जातो सांगून घरी परतलेच नाही, दुसऱ्या दिवशी पैनगंगा नदीत सापडला मृतदेह; डोणगाव येथील घटना!

  डोणगाव :- अंत्री देशमुख येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा पैनगंगा नदीपात्रात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल विष्णू मोरे (वय ४२, रा. अंत्री देशमुख) हे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी घराबाहेर पडले होते. दररोजप्रमाणे ते मेहकर येथे कामावर जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून गेले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला…

Read More

ट्रक-दुचाकी अपघातात कृषी महाविद्यालयाच्या शिक्षकाचा मृत्यू, ब्रह्मपुरी फाट्याजवळील घटना!

  डोणगाव :- हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गजानन नागोराव टाले (४७) यांचा अपघातात मृत्यू झाला. मेहकरहून हिवरा आश्रमकडे जात असताना मंगळवारी रात्री ८ वाजता ब्रह्मपुरी फाट्याजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. गजानन टाले हे मूळचे डोणगाव येथील रहिवासी होते. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला….

Read More

पद्मश्री डॉ. वि. भिं. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये १२० विद्यार्थ्यांना स्किल आणि इंडस्ट्री एम्प्लॉयबिलिटी प्रशिक्षण

मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भिं. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज, मलकापूर येथे १२ ते १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान १२० विद्यार्थ्यांना इंटर्नशीप एवं स्किल, इंडस्ट्री एम्प्लॉयबिलिटी व मेंटरींग प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सेन्साटा टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. पुणे यांच्या सीएसआर निधीतून लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. डिवाइस इलेक्ट्रॉनिक, पुणे यांच्या…

Read More

शेगावमध्ये लाखो भाविकांचा महापूर, संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मंदिर दिवसभर राहणार खुले

शेगाव :- विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रगटदिन उत्साहात साजरा होत आहे. लाखो भाविकांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली असून, भाविकांच्या सेवेसाठी मंदिर १९ फेब्रुवारीपासून चोवीस तास दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. प्रगटदिनानिमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान…

Read More

मलकापूरमध्ये शिवजयंती उत्सवाचा भव्य जल्लोष! शहर दणाणले ढोल-ताशांच्या गजरात, भगवे ध्वज फडकले अभिमानाने!

मलकापूर( दिपक इटणारे ): छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मलकापूर शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा निनाद, तुतारीचा गजर आणि गगनभेदी जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते. हजारो शिवभक्तांनी भगवे ध्वज हाती घेत “जय भवानी, जय शिवराय!” च्या गर्जनेत संपूर्ण शहर शिवमय केले. पराक्रमी इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांनी, शौर्यप्रदर्शनाने आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांनी शिवजयंती उत्सवात भारावलेली ऊर्जा…

Read More
error: Content is protected !!