
जुना वाद उफाळला; दोन गटात तुफान हाणामारी, लाठ्या-काठ्या चालल्या, अमडापूर पोलीस ठाण्यात 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अमडापूर : उदयनगर येथे २२ फेब्रुवारी रोजी जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. लाठ्या-काठ्यांसह झालेल्या या वादात अश्लील शिवीगाळही करण्यात आली. अमडापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील एकूण ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.