कंटेनर – आयशरचा समोरासमोर भीषण अपघात – चार जण गंभीर जखमी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील घटना!

  मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नांदुरा रोडवरील पुलाजवळ १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कंटेनर आणि आयशर यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक व वाहक असे चार जण गंभीर जखमी झाले. अपघातात सुलेमान शहा (३०, रा. अजमेर), नाझीर बेग (३०, रा. अजमेर), अस्लम शहा (३५, … Read more

कुंभमेळ्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन!

  बुलढाणा – उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने जाहीर केलेले हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – प्रयागराज कंट्रोल रूम: टोल-फ्री क्रमांक १९२०, दुरध्वनी क्रमांक ०५२२-२२३७५१५ मंत्रालय नियंत्रण कक्ष: ०२२-२२०२७९९० … Read more

जागेच्या वादातून हाणामारी; तिघांवर गुन्हा दाखल, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील कंझारा येथे जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारींवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की २९ जानेवारी रोजी संतोष फकीरा शेगोकार यांनी प्रभाकर पंढरी शेगोकार यांना घराच्या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत … Read more

सिंदखेडराजा येथे बँकेसमोरून भरदिवसा मोटारसायकल डिक्कीतून अडीच लाखांची चोरी!

  सिंदखेडराजा: शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेसमोर उभी असलेल्या मोटारसायकलची डिक्की फोडून अज्ञात चोरट्याने अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. चिंचोली जहागीर (ता. सिंदखेडराजा) येथील शेतकरी अनिल राठोड हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर आपल्या एम. एच. २८ एएम १३६१ क्रमांकाच्या मोटारसायकलजवळ उभे राहून नातेवाईकांशी संवाद साधत होते. त्याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारसायकलच्या … Read more

error: Content is protected !!