
किरकोळ कारणावरून मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल! मलकापूर तालुक्यातील जांभुळधाबा येथील घटना
मलकापूर: तालुक्यातील जांभूळधाबा येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या उपाध्यक्षासह त्यांच्या नातेवाईकावर मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी गजानन नीना मेहेंगे (वय ५५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे हा प्रकार घडला. मंदिराचे माजी अध्यक्ष यांच्या…