
शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकासाठी संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाची मागणी
मलकापूर :- पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मलकापूरचे सुपुत्र संजयसिंह भिकमसिंह राजपूत शहीद झाले होते. त्यांच्या सन्मानार्थ मलकापूर येथील माता महाकाली परिसरात विवेकानंद आश्रमजवळ स्मृतीस्मारक उभारण्यात आले आहे. परंतु, या स्मारकाभोवती तारेचे कंपाऊंड किंवा संरक्षण भिंत नसल्यामुळे स्मारकाचे पावित्र्य अबाधित राहत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली…