
रविवारी मलकापूरमध्ये आरोग्य सेवा ठप्प; खाजगी डॉक्टरांचा निष्काळजीपणा अपघातग्रस्तासाठी ठरला जीवघेणा
मलकापूर( दिपक इटणारे ): रविवारी खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांच्या निष्काळजी वर्तणुकीमुळे शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. काल दि. 12 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका रुग्णाला जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त रुग्णासाठी तातडीच्या उपचारांची नितांत आवश्यकता असताना, खाजगी डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णाच्या जीवावर बेतले. शहरातील खाजगी रुग्णालये फक्त व्यवसायिक हितसंबंधांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचा…