Headlines

कुत्रा आडवा आल्याने कारचा अपघात; सीट बेल्ट आणि एअर बॅगमुळे चौघे प्रवासी बचावले

बुलढाणा :- समृद्धी महामार्गावर गुरुवारी १६ जानेवारी रोजी कुत्रा आडवा आल्याने कार (एमएच १२-एफवाय ५९०९) अनियंत्रित होऊन बेरिकेडला धडकली. यात कारचे मोठे नुकसान झाले, पण सीट बेल्ट आणि एअर बॅगमुळे चौघे प्रवासी बचावले. सिंदखेडराजा जवळ घडलेल्या या अपघातात स्लोक कोळमकर (२४) व पुष्पेंद्र गुभा (२७) गंभीर जखमी झाले. मोनाली टीपाल (२८) आणि चालक संकरित रेड्डी…

Read More

शिराढोण येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा शुभारंभ

  मलकापूर: विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे शिराढोण येथे विशेष शिबिराचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिरात रस्ते दुरुस्ती, नदीकाठ आणि स्मशानभूमी स्वच्छता यांसह शिव्या मुक्त गाव, घराघरात संविधान, अंधश्रद्धा निर्मूलन, डिजिटल साक्षरता व स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय मोरेशजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्राचार्य डॉ….

Read More

झोपलेल्या इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन व पैसे लंपास.. तिघांवर गुन्हा दाखल; खामगाव शहरातील घटना

  खामगाव :- येथील बाळापुर नाका परिसरातील अजय हॉटेलसमोर १७ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला. निलेश वसंतराव गव्हाळ (४१, रा. जगदंबा रोड) हे रात्री १२.३० वाजता बाजीवर झोपले होते. मध्यरात्री १.३० वाजता जाग आल्यावर त्यांना त्यांच्या गळ्यातील ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ५० हजार रुपये रोख व मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. चोरीचा…

Read More

मित्रानेच काढला मित्राचा काटा, तोंड दाबून केली युवकाची हत्या, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर :- शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील मोकळ्या मैदानात बुधवारी, १५ जानेवारी रोजी रात्री उशिरा प्रविण अजाबराव संबारे (वय २७, रा. बेलाड, ता. मलकापूर) या युवकाची तोंड दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रविणचा भाऊ सचिन अजाबराव संबारे (वय ३२) याने पोलिसांत तक्रार दिली असून वैभव गोपाल सोनार (वय २१, रा. तरोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव…

Read More

ट्रक डिझेल टँकचा स्फोट; वेल्डरचा मृत्यू, मलकापूर शहरातील घटना!

  मलकापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी ट्रक डिझेल टँक वेल्डिंग दरम्यान भीषण स्फोट झाला. या अपघातात वेल्डर शेख रहीम शेख अजीज (वय ५५, रा. मलकापूर) गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथे हलवण्यात येत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. शाहरुख जाफर पटणे (रा. जामनगर, गुजरात) यांनी ट्रक (क्रमांक जी.जे. १० झेड…

Read More

मजुराचा पाण्यात पडून मृत्यू, मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील घटना!

मोताळा :- तालुक्यातील पिंपळगाव देवी येथे एका मजुराचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत मजुराचे नाव गणपत जगन भोई (वय ४५) असून, तो बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मांजरोद येथील रहिवासी होता. पिंपळगाव देवी यात्रेत अनिल भोई (रा. बोदवड) यांच्या दुकानात गणपत भोई काम करीत होता. मात्र, दारुचे व्यसन असल्यामुळे तो १४ जानेवारी रोजी…

Read More

म्हाडा कॉलनीतील पत्रकाराचे घर फोडले; १ लाखांचा ऐवज लंपास, बुलढाणा शहरातील घटना!

बुलढाणा :- म्हाडा कॉलनीत एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराच्या घरात चोरी झाली असून, चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. १५ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुढारी न्यूज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी संदीप वानखडे हे कुटुंबासह १२ जानेवारी रोजी बाहेरगावी गेले होते. बुधवार, १५ जानेवारी रोजी ते घरी परतल्यावर दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात…

Read More

कोलते महाविद्यालयाचा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थानावर

मलकापूर: पद्मश्री डॉ. वि. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. महाविद्यालयाच्या आयडिया इनोव्हेशन प्रोजेक्ट ची निवड राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे, या पाच प्रकल्पांमध्ये आमच्या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रा. मोहम्मद जावेद सर यांच्या अद्वितीय कल्पना आणि नवकल्पनांमुळे या प्रकल्पाची निर्मिती शक्य झाली आहे….

Read More

मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची गैरहजेरी नित्याचीच, रुग्णांचे जीव धोक्यात; उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर मिळणार का ?

मलकापूर( दिपक इटणारे ):- विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. या रुग्णालयावर तालुक्यातील हजारो नागरिक अवलंबून आहेत. मात्र, येथे कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात एका तरुणाला रुग्णालयात…

Read More

दुर्दैवी घटना; दोन दिवसाआधी लग्न ठरल, काल नायलॉन मांजाने तरुणाचा बळी घेतला!

  नाशिक:- नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन मांजानं गळा कापल्याने सोनू धोत्रे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच त्याचं लग्न ठरलं होतं. बहिणीला घ्यायला जात असताना ही घटना घडली. मागील दीड महिन्यात नायलॉन मांजामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून 9-10 जण जखमी झाले आहेत.मकर संक्रांतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा वापर होत आहे. पोलिसांनी…

Read More
error: Content is protected !!