Headlines

बुलढाण्यात मृत अर्भक आढळले, अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल!

  बुलढाणा:- जिल्हा कारागृहाच्या मागे असलेल्या शाळेजवळ बुधवारी एक मृत अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा ‘डीएनए’ नमुना सुरक्षित ठेवण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी श्रीकांत धारकरी या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, अर्भकाच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार…

Read More

उभ्या ट्रकवर कार आदळली; एकाच सरणावर तिघा बाप लेकांवर अंत्यसंस्कार, अपघातात चौघांचा मृत्यू!

डोणगाव :- जालना जिल्ह्यातील महाकाळा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात शेलगाव देशमुख येथील चौघांचा मृत्यू झाला. होंडा सीटी कार (एमएच-२०-सीएस-६०४१) उभ्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. यात भागवत चौरे (३८), त्यांची मुलगी सृष्टी (१४), मुलगा स्वराज (८) आणि मामी अनिता कुटे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला.भागवत चौरे आणि कुटे कुटुंब पुण्याहून सुबोध कुटे याला सोडून परतत…

Read More

बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरातून बॅटरी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

बुलढाणा :- बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरातून बॅटरी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली, जेव्हा जनरेटर सुरू करण्यासाठी कर्मचारी गेले. तेव्हा जनरेटरची बॅटरी गायब असल्याचे लक्षात आले. या घटनेबाबत भूषण चोपडे यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.चोरी नेमकी…

Read More

मराठा सेवा संघाच्या मलकापूर तालुका कार्यकारिणीची विस्तार

  मलकापूर:- मराठा सेवा संघ परिवारात सक्रीय असलेल्या प्रत्येकाने आपले मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे श्रम, वेळ, बुध्दी, कौशल्य व पैसा या पंचदानातील जे शक्य असेल ते दान देवून मराठा सेवा संघ ही चळवळ वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा सहसचिव शिवश्री विष्णू म्हैसागर सर यांनी कार्यकारिणी विस्तारप्रसंगी केले….

Read More

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत के बी जे आयटीआयला प्रथम क्रमांक

बुलढाणा: बोरखेडी मोताळा येथील के बी जे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी 2024 मध्ये सोलर कुलर या प्रकल्पासाठी प्रथम क्रमांक पटकावला आहे. “सौर ऊर्जा ही काळाची गरज” या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाने उपस्थितांचे लक्ष वेधले. सदर सोलर कुलर दिवसा सौरऊर्जेवर तर रात्री बॅटरीमध्ये साठवलेल्या विद्युत उर्जेवर चालते. विशेष म्हणजे, यामध्ये 13 तासांचा बॅकअप…

Read More

चाकूचा धाक दाखवत दीड लाखांची लूट, आरोपी पोलीस कोठडीत, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : वाहन अडवून जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न करत दीड लाख रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. इस्माइल उर्फ बाबू खान रहमान खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रहिम शेख, काळू शेख (रा. मदर टेकीडी, पारवे, मलकापूर) आणि त्यांचे साथीदार र. चिंचवड, पुणे हे सोमवारी, ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या…

Read More

नववर्षाची दिलखुलास भेट; बुलढाणा पोलीस दलातील ४७ जणांना पदोन्नती!

  बुलढाणा :- बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील ४७ अंमलदारांना पदोन्नतीचे गिफ्ट दिले. या अंतर्गत १९ हेड कॉन्स्टेबलना सहायक पोलीस उपनिरीक्षक, तर २७ पोलीस नाईकांना हेड कॉन्स्टेबल पदावर पदोन्नती देण्यात आली.पदोन्नतीसह ईच्छित स्थळी बदलीचा पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पानसरे यांनी पद्भार स्विकारल्यापासून पोलीस दलातील कार्यक्षमता…

Read More
error: Content is protected !!