
सर्पदंशाने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू,१५ दिवसांपूर्वी झाला होता विवाह
वरवट बकाल- येथील रंगाचा व्यवसाय करणारे व्यापारी संदीप शेषराव तेटू (वय ३१ वर्ष) हे नेहमी प्रमाणे वरवट बकाल बस थांब्यावरील रंगांच्या दुकानात २२ मे रोजी सकाळी गेले असता त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. संदीप तेटू यांना प्रथम खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले….