Headlines

मलकापुरात क्षुल्लक वादातून हाणामारी; पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला; शहरात तणावपूर्ण शांतता

मलकापूर :- बसस्थानकाजवळ एका क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. “तू माझ्याकडे काय बघतो” या कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला जाऊन हाणामारीत बदलला. या घटनेत दोघे जखमी झाले असून शहरात काही काळ दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आटोक्यात आली. ही घटना काल रात्री 10.15 च्या सुमारास घडली. सविस्तर…

Read More

चित्रपट पाहून येत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक, दुचाकी वरील दोन भावंडांसह मित्राचा मृत्यू! अमडापूर येथील घटना

चिखली (बुलढाणा): अमडापूरच्या टिपू सुलतान चौकात एका भरधाव अज्ञात वाहनाने पल्सर मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने तिघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन जण एकाच घरातील असून तिसरा त्यांचा मित्र आहे. ही दुर्दैवी घटना 13 डिसेंबर रविवारी रात्री घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले युवक हे उदयनगर येथील रहिवासी आहेत.प्रतिक संजय भुजे (25 वर्षे) प्रथमेश राजू भुजे (26…

Read More

दोन्ही किडनी निकामी असलेल्या मुलीला वडिलांनी दिली किडनी दान; किडनीदानातून मुलीचा पुनर्जन्म”

  जळगाव : मानवतेच्या सर्वोच्च प्रतीकाला उजाळा देणारी घटना रावेर तालुक्यातील मांगलवाडी येथे घडली आहे. येथील ५९ वर्षीय बाबुराव कोळी यांनी आपल्या किडनी विकाराने त्रस्त असलेल्या २९ वर्षीय मुलीला आपली किडनी दान करून तिला नवीन जीवन दिले.रुपाली योगेश कोळी (साळुंखे) (रा. चिंचोली, ता. यावल) या तरुणीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे ती अडीच वर्षांपासून डायलिसिसवर होती….

Read More

मलकापूर एमएसईबी कार्यालयातील लाच प्रकरण; फरार आरोपीला अटक; दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी!

  अकोला :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोलाने मोठी कामगिरी करत एमएसईबी मलकापूर येथील लाच प्रकरणातील फरार आरोपी शांतशील बोदडे (राहणार मलकापूर) याला अटक केली आहे. १० डिसेंबर रोजी विभागाने सापळा रचून कारवाई केली होती, मात्र शांतशील बोदडे फरार झाला होता.१२ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबवत बोदडे याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता,…

Read More

शेगावात मटका खेळविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, 430 रुपयांसह साहित्य जप्त!

खामगाव (जि. बुलढाणा) – शेगाव येथील विश्राम भवनासमोरील रस्त्याच्या बाजूला अवैधरित्या मटका खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या दिनेश यशवंत इंगळे (वय 43, रा. चिचोंडी, ता. शेगाव) याला 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शेगाव पोलिसांनी अटक केली.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून दिनेश इंगळेला मटक्यासाठी जमा केलेले 430 रुपये व साहित्यसह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी…

Read More

खामगावच्या एमआयडीसीतील दोन कंपनीत चोरी; अडीच लाखांची रोकड लंपास, चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..

खामगाव :- एमआयडीसीत १२ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वेगवेगळ्या उद्योगांमध्ये चोरीची घटना घडली. समृद्धी इंडस्ट्रीज आणि चिराऊ पावर प्रा. लि. या कार्यालयांमधून अज्ञात चोरट्यांनी एकूण अडीच लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री १२.३० ते २.३० वाजेदरम्यान ही चोरीची घटना घडली. समृद्धी इंडस्ट्रीजच्या कार्यालयातून सुमारे १ लाख रुपयांची रोख तर चिराऊ पावर प्रा. लि.च्या…

Read More

नदीपात्रात आढळला 40 वर्षीय महिलेचा मृतदेह, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव : तोरणा नदीच्या पात्रात एका 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव सरला राजू पांढरे असे आहे. त्या गावाजवळच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. 12 डिसेंबर रोजी सकाळपासून त्या बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह स्थानिक लोकांना नदीच्या पात्रात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीसांनी पंचनामा करून…

Read More

स्कूल बस व दुचाकीची धडक, २१ वर्षीय युवक ठार

बुलढाणा:- तालुक्यातील खुपगाव येथील २१ वर्षीय जीवन मुकुंदा इंगळे याचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहराजवळील आश्रम शाळेजवळ घडली. जीवन इंगळे हे बुलढाणा येथील एका हेअर सलून मध्ये काम करत होते. बुधवारी सकाळी ते दुचाकीने कामावर जात होते, त्याचवेळी शिवसाई ज्ञानपीठ शाळेची बस साखळीकडे जात…

Read More

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला केली धक्काबुक्की; बोरखेडी पोलिसात गुन्हा दाखल!

मोताळा :- येथील शिवारात १० डिसेंबर रोजी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला एक ट्रॅक्टर चालक धक्काबुक्की करून ट्रॅक्टर घेऊन पलायन झाला. संबंधित ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला परवाना न दाखवता वाळूची वाहतूक करताना पकडले गेले, परंतु त्याने कारवाईला विरोध करत महसूल पथकावर शारीरिक हल्ला केला. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

मविआला हादरा बसणार: शिवसेना, भाजपाच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार-खासदार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. महायुती सरकार स्थापन होऊन आठवडा झाला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने सत्ताधारी आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील काही नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा करून राजकीय वातावरण अधिक तापवण्यात आले आहे. संजय शिरसाट यांचा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट…

Read More
error: Content is protected !!