
मलकापूर विधानसभा : रावळ आणि आ. एकडे मध्ये आरोप – प्रत्यारोप अन् रावळांचा अर्ज मागे; काँग्रेसची अंतर्गत कलह आणि बंडखोरीचे राजकीय नाट्य
मलकापूर:- ( उमेश इटणारे ) विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले आहेत. काँग्रेसने विद्यमान आमदार राजेश एकडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माजी नगराध्यक्ष एडवोकेट हरीश रावळ यांनी या निर्णयाविरुद्ध बंडखोरीचा निर्णय घेत, अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली. काँग्रेस पक्षात तिकीटाबद्दल सुरुवातीपासूनच चर्चा असतानाच, हरीश रावळ यांचं नाव उमेदवारीसाठी प्रखरपणे चर्चेत होतं. तथापि, २०१९…