
सोयाबीन गंजीला आग, अज्ञाताविरुध्द गुन्हा; शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी!
नांदुरा: शेतकऱ्याने ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या सोयाबीन गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्यामुळे १२ पोते सोयाबीन आणि ताडपत्री जळून खाक झाली. या घटनेत शेतकऱ्याचे ४२ हजारांचे नुकसान झाले आहे. २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाकुड शीवाऱ्यातील उध्दव हरीचंद्र सित्रे यांच्या शेतात ही घटना घडली. सित्रे यांनी आपल्या ७४ आर शेतीत सोयाबीन पेरले होते, ज्याची गंजी…