
घटस्थापनेच्या दिवशी मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा शॉक लागून मृत्यू! डोलारखेड येथील घटना
जलंब : दोन युवकांना विद्युत तारेचा शॉक लागल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नजीकच्या डोलारखेड येथे घडली. येथून जवळच असलेल्या डोलारखेड येथे नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गाची स्थापना करण्यात आली आहे. येथील एका सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सायंकाळी घटस्थापना होऊन आरतीही झाली. यानंतर शुभम गजानन देठे (वय २१) व गोवर्धन…