शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीची आमिष दाखवून प्राध्यापिकेची १ कोटी ५ लाखांची फसवणूक.. दोन आरोपींना हरियाणा येथून अटक!

वृतसंस्था ) जळगाव : शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्राध्यापिकेची एक कोटी रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी मुकेश सुभाष (२६), अंकुश सतपाल (२७), दोघे रा. नाधोरी ता. भुना जि. फतेहबाद, हरयाणा या दोघांना जळगाव सायबर पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोन जणांना या पूर्वीच अटक केलेली आहे. आता … Read more

मराठमोळ्या युवकांनी युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहरामध्ये केली लाडक्या गणरायाची स्थापना!

महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे. यावर्षी हा उत्सव 9 दिवस चालणार असुन यामध्ये दररोज आरती, महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे गणेशोत्सव याहीवर्षी मागील वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करत आहे या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे परंपरेचे जतन परदेशात … Read more

खामगाव बस स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंड येथील सराईत चोरट्यास अटक,42 हजाराचा मुद्देमाल जप्त, खामगाव पोलिसांची कारवाई!

खामगाव : स्थानिक शहर पोस्टेला तक्रारीवरुन मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या घटनेतील झारखंड येथील मोबाईल चोरट्यास ७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोपाल सुरेशराव पवार वय ३९ रा. खडकी अकोला यांनी ७ सप्टेंबर रोजी शहर पोस्टेला फिर्याद दिली की मी शहरात कामानिमित्त आलो होतो. दरम्या येथील बसस्थानक येथे माझा मोबाईल किंमत ७ हजार … Read more

दुचाकीला मॉडीफाईड सायलेन्सर बसवून फटाके फोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज, मलकापुरात मॉडीफाईड वाहनांची संख्या वाढली!

  उमेश ईटणारे मलकापूर :- दुचाकीला मॉडीफाईड सायलेन्सर बसवून फटाके फोडणाऱ्या व वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. मलकापुरात काही दुचाकी वाहन चालकांकडून दुचाकीचे सायलेन्सर बदलवून तिला मॉडिफाइड सायलेन्सर बसविले आहे. या मॉडिफाइड सायलेन्सर मधून कर्कश आवाज येत असतो अश्या वाहनांमधून ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा … Read more

गुलाबाच्या फुलांची उधळण, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष, ढोल ताशाच्या तालावर तरुणांनी घेतलेला ठेका अधून मधून पावसाचा कहर व मलकापूर पोलीस प्रशासनाचे उत्कृष्टनियोजन अश्या भक्तिमय वातावरणात बाप्पा झाले विराजमान

मलकापूर:- ( दिपक इटणारे ) गुलाबाच्या फुलांची उधळण, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष, ढोल ताशाच्या तालावर तरुणांनी घेतलेला ठेका अधून मधून पावसाचा कहर व मलकापूर पोलीस प्रशासनाचे उत्कृष्टनियोजन अश्या भक्तिमय वातावरणात लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये बाप्पा विराजमान झाले. शनिवारपासून दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. भक्तिमय वातावरणात घराघरांत आणि लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पा … Read more

मलकापुरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनेतील आरोपीला आठ महिन्यानंतर जळगाव खा. मधून अटक! चांडक विद्यालय रोडवर घडली होती घटना

मलकापूर : शहरात २९ जानेवारी रोजी घडलेल्या मंगळसूत्र चोरीचा छडा लावण्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून मुख्य आरोपीस जळगाव खांदेशमधून अटक करण्यात आली. दरम्यान, त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.शहरातील देशपांडे गल्लीत राहणाऱ्या ऋतुजा श्रेयस व्यवहारे २९ जानेवारी रोजी स्कुटीने जात असताना त्यांच्यामागून दुचाकीवरून दोन युवक आले. त्यांनी ऋतुजा व्यवहारे गळ्यातील ४० … Read more

बेलाडच्या सरपंचाविरोधात अविश्वास पारित

मलकापूर:- तालुक्यातील बेलाड ग्रामपंचायत सरपंचाविरोधात ८ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. अविश्वास ठरावावर तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. बेलाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह आठ सदस्यांनी २ सप्टेंबर रोजी विद्यमान सरपंच सचिन संबारे पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता. त्यात विकास कामात विश्वासात न घेणे, करवसुलीत पुढाकार न … Read more

हिंगणा काझी ग्रामवासियांच्या समस्येसाठी तहसीलदारांना निवेदन, मागणीची दाखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा

मलकापूर :- आज दिनांक 05.09.2024 ला हिंगणा काझी ग्रामवासी यांनी गावातील शेत रस्ता तात्काळ पक्का करून मिळणे बाबत तसेच व्याघ्रा नदीवरील पुलाची निर्मिती तात्काळ करून देणे बाबत वंचित चे तालुका नेते अजय सावळे यांच्या नेतृत्वात आणि सुशील मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार राहुलजी तायडे तसेच विस्तार अधिकारी होळकर साहेब यांना संयुक्तपणे निवेदन दिले. सविस्तर बातमी … Read more

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली, लाडक्या गणरायाच्या सजावटीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी!

  उमेश ईटणारे मलकापूर :- लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने गणेश भक्तांनी बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठेत वेगवेगळ्या सामानांची खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांचीं बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या आगमनासाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने घरगुती गणपती बुक करण्यासाठी बाजारापेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. तसेच, नागरिक … Read more

किरकोळ वादातून चाकूने वार, एक जण जखमी, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : येथील मंगल गेट परिसरात बांधकामांचे साहित्य ठेवण्याच्या किरकोळ वादातून एकाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना आज, ४ सप्टेंबर रोजी मंगल गेट परिसरात घडली. मलकापूर येथील आरोपी राजेश प्रेमचंद शर्मा (वय ५०, रा. मंगल गेट) व निलेश प्रकाश सोनोने या दोघांत सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य ठेवण्यावरून आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाद निर्माण झाला. … Read more

error: Content is protected !!