Headlines

शेगाव मध्ये चोरींचे प्रमाण वाढले,घर फोडून चोरट्यांनी दाग दागिन्यांसह 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल केला लंपास!

शेगाव : शेगाव शहरात चोरींचे प्रमाण वाढतच चालले आहे. मागील महिन्यात अनेक चोरींच्या घटना घडल्या आहेत अशीच एक घटना येथील रोकडीया नगरात असलेल्या नालंदा कॉलनी मध्ये ५ ऑगस्ट रोजी घडली. चोरट्यांनी घर फोडून २ लाख २५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.याबाबत योगेश गोपाळराव मुके वय ३४ वर्ष रा.नालंदा कॉलणी, रोकडीया नगर शेगाव यांनी शहर पोलिसात…

Read More

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव तालुक्यातील घटना

  खामगाव : तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस एका युवकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तालुक्यातील एका गावातील मुलीच्या वडीलांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले की त्यांच्या १७ वर्षीय मुलीस केशव साहेबराव हागे रा. चितोडा याने फुस लावून पळवून नेले.या तक्रारीवरुन पोलिसांनी केशव हागे याच्याविरुध्द कलम १३७…

Read More

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी करा – संतोष शिंदे, उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे आवाहन!

मलकापूर:- दिनांक :- ०६/०८/२०२४ मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार २१-मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये १ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून, सदर कार्यक्रमांतर्गत ०६ ऑगस्ट, २०२४ रोजी २१ मलकापूर विधानसभा मतदार संघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादया प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर…

Read More

उभ्या ट्रकला कारची धडक, अपघातात सानंदा परिवारातील तिघे जखमी!

खामगाव : जालना नजीक उभ्या ट्रकवर कार धडकून झालेल्या अपघातात खामगावातील सानंदा कुटुंबातील तिघे जखमी झाल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, सानंदा कुटुंबातील काहीजण पूणे येथून कार क्र. एमएच २८-एएन २१९१ ने खामगावकडे निघाले होते. दरम्यान पहाटे ४.३० वाजेच्या…

Read More

उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या १० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अध्यक्षा, उपाध्यक्षसह 10 संचालक व ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल!

मलकापूर : स्थानिक उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या सहकारी अध्यक्षा, उपाध्यक्षासह १० संचालक व व्यवस्थापक, कर्मचारी अशा १३ जणांवर आज विशेष लेखापरीक्षक वर्ग २ सहकारी संस्था पणन बुलढाणा सौ. ए. एम. व्यवहारे यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये १० कोटी रूपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती अशी की, विशेष…

Read More

भर दिवसा घरातील दाग दागिने व रोख रक्कम चोरी ,६४ हजाराचा मुद्देमाल लंपास! शेगाव तालुक्यातील घटना

शेगाव : तालुक्यातील अळसणा येथे २ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान राहत्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नजमाबी शेख रफिक वय ३२ वर्ष रा. ग्राम आळसणा यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे की माझे मुले घरीच असल्याने घराला कुलुप…

Read More

लक्ष्मी नगरात एकाच रात्री २ ठिकाणी घरफोडी,१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास

नांदुरा : शहरातील वार्ड क्रं. एक मधिल लक्ष्मी नगर भागात दोन ठिकाणी घरफोड्या होवून चोरट्यांनी १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला ही घटना दोन ऑगस्टच्या रात्री घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मी नगर येथील गुणवंत भाऊराव साबे वय ५० हे 2 ऑगस्टच्या रात्री…

Read More

धनराज राजपूत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!

मलकापूर:- येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज राजपूत यांचा वाढदिवस विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे धनराज राजपूत यांचा 3 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी रिकामा खर्च न करता गरजूंना साहित्य वाटप तसेच रक्तादान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. येथील मूकबधिर शाळेत त्यांनी गरजूंना जेवण व…

Read More

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी पाच दिवसीय विकास कार्यक्रमाचे आयोजन

    मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दिनांक 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत ‘इनोव्हेशन स्ट्रॅटेजी इन इंग्लिश लँग्वेज’ या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इंग्लिश कम्युनिकेशन कोच आणि मोटिवेशन ट्रेनर भरत आर. साळवे सर यांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापकांना या पाच दिवसीय कार्यक्रमांमध्ये…

Read More

जेष्ठ नागरिकांची तिर्थाटनाची मनोकामना पूर्ण करणारी- मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना

लेख:- अंर्तमनात भक्तीभाव व परमेश्वरावर अतूट श्रध्दा असणा-या प्रत्येक मनुष्याला तिर्थाटन करावे असे मनोमन वाटते पण महागाईचा काळ व प्रापंचिक अडचणी असल्यामुळे या भाविक लोकांची मनोकामना अपुरीच राहते. तिर्थाटन करण्यासाठी कुणाजवळ पुरेसा व मुबलक पैसा नसतो. आर्थिक अडचण असते. म्हणून हे लोक श्रध्दा असूनही तिर्थयात्रेची इच्छा पूर्णत्वास नेऊ शकत नाही. याबाबतीत भाविकांची तिर्थयात्रेच्या मनोकामनेला मूर्तरुप…

Read More