
संताजी नगरातील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव दहीहंडी कार्यक्रम संपन्न
मलकापुर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम संताजी नगर येथील श्रीकृष्ण मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता बाल – महिला भजनी मंडळ वडगाव तिघे ता. जामनेर येथील भजनी मंडळांने भगवान श्रीकृष्ण यांच्या महंतीपर भजने सादर केली तद्नंतर जन्म अध्याय घेण्यात आला, देवाला गंध, अक्षदा,विडा अर्पण करून महाआरती करण्यात आली,…