Headlines

घरासमोर खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचे अपहरण,चिखली पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

चिखली : घरासमोर खेळताना १० वर्षीय चिमुकल्याचे अपहरण झाले. अंबाशी येथे काल २२ जुलैच्या सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अंबाशी येथील हारून शेख गणी यांनी चिखली पोलीस ठाण्यात सायंकाळी तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की सकाळच्या सुमारास घरासमोर त्यांचा मुलगा मोहम्मद अरहान हा खेळत होता. खूप वेळ उलटून गेला तरी अरहान…

Read More

महाराज आपणच आमचे  गुरु, माता, पिता, बंधू, सखा, गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात आमचा सांभाळ करा म्हणत स्वामी भक्तांनी गुरुपद स्वीकारले; मलकापूर शहरातील स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

मलकापूर:- अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी स्वामी नामाने चिंता मिटतात, असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आले आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून, ती समजाला नेहमीच बोधप्रद ठरत असते याच धरतीवर स्वामी भक्तांनी गुरू पौर्णिमेला स्वामींना गुरू मानून असंख्य महिला व पुरुषांनी गुरुपद…

Read More

पत्नी माहेरी गेलेले असताना पतीने घरात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा! साखरखेर्डा येथील घटना

साखरखेर्डा : पत्नी माहेरी गेलेली असताना शिवाजीनगर येथील एका इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० जुलै रोजी दुपारी पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. सुनील सिद्धार्थ इंगळे असे मृत इसमाचे नाव आहे.शिवाजीनगर येथील रहिवासी सुनील सिद्धार्थ इंगळे (वय ३५) हा कुटुंबासह वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्याने तो एकटाच घरी राहत होता. त्याने शनिवारी घरातील…

Read More

श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट मलकापूरच्या वतीने तीन दिवसीय पायदळ वारी संपन्न

मलकापूर :- गुरुपौर्णिमे निमित्ताने श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट,मलकापूर यांच्या वतीने मलकापूर ते शेगांव तीन दिवसीय पायदळ वारी आयोनज 19,20,21,जुलै रोजी करण्यात आले होते.भुलेश्वर संथान कुलमखेड येथून सकाळी “श्रीं”च्या मुखवटा व पादुकांचे विधिवत पूजन व महाआरती करून सकाळी 8 वाजता पालखी मार्गास्थ झाली.मलकापूर शहरासह पंचक्रोशीतील टाळकरी,वारकरी महिला व पुरुष यांचेसह जवळपास पंधराशे भविकभक्त…

Read More

शिकवणी वर्गाला जात असलेल्या अल्पवयीन बालिकेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना

शेगाव:- घरून गावात असलेल्या शिकवणी वर्गाला जाणाऱ्या एका आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शेगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात ही घटना ९ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यावरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी राजेश उर्फ राजू…

Read More

मलकापूर बस स्थानकात चोरी, आईला उपचाराकरिता घेऊन जात असलेल्या प्रवाशाच्या खिशातील 15000 लांबविलेदिपक

मलकापूर ( उमेश इटणारे ):- आईच्या उपचाराकरिता जळगाव खा. येथे जाण्यासाठी मलकापूर बस स्थानकात आलेल्या प्रवाशाच्या खिशातील बसमध्ये चढताना पंधरा हजार रुपये लांबविण्याची घटना काल दि.19 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मलकापूर बस स्थानकात घडली. याबाबत ( नितीन वाघडे )यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली की त्यांना आईच्या उपचाराकरिता जळगाव खान्देश येथे जायचे होते. त्यासाठी ते…

Read More

कोलते अभियांत्रिकी मधील एनसीसीचे विद्यार्थी महाराष्ट्र बटालियन कडून पुरस्काराने सन्मानित

  मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथील एनसीसी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बटालियन, खामगाव आयोजित विविध प्रोग्राम मध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव जमदाळे याला महाराष्ट्र बटालियन कडून बेस्ट कॅडेट चा अवार्ड मिळाला, विद्यार्थ्यांनी सायली राजेंद्र वराडे हिला फायरिंग मध्ये पहिले पारितोषिक मिळाले आणि वैष्णवी भोपळे हिला सांस्कृतिक कार्यक्रम लावणी…

Read More

झाडाला गळफास घेऊन 65 वर्षीय वृद्धाची आत्महत्या! देऊळगाव राजा येथील घटना

देऊळगाव राजा:- येथील धोंडीराम मठासमोर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन ६५ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना १९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आले. गुलाबराव बालाजी उगले (६५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वप्नील विष्णू रामाने सकाळी रस्त्याने जात असतांना त्यांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, गुलाबराव बालाजी उगले यांनी नेमक्या…

Read More

मंदिरातील दानपेटीवर चोरट्याची काळी नजर,दानपेटीतून ५ हजार अन् स्टीलचे डबे लांबविले !

  खामगावः गजानन महाराज मंदिरातील दानपेटीवर चोरट्याने काळी नजर ठेवून दानपेटी फोडून त्यातील पाच हजार रुपये आणि दोन स्टीलचे डबे लंपास केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा येथील श्री गजानन महाराज मंदिरातील कुलूप तोडून चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील पाच हजार रुपये तसेच दोन स्टीलचे डबे चोरून नेले. ही घटना गुरुवारी पहाटे पुजारी…

Read More

पेट्रोलच्या बहान्याने दुचाकी स्वाराला थांबवले अन् घात केला, चोरट्यानी खिशातील एका लाखाची रोकड आणि पाच हजाराचा मोबाईल लांबवला

मेहकर : मेहकर बायपासवर दुचाकीस्वाराला अडवून चोरांनी एक लाख रुपये नगदी व पाच हजार रुपयांचा मोबाईल चोरला. ही घटना १७ जुलै रोजी घडली. आरेगाव येथील संतोष उकंडा साखले व त्यांचे नातेवाईक हे दुचाकीवरून तळणी (ता. मंठा जि. जालना) येथे गेले होते. तळणी येथून नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेऊन ते पुन्हा दुपारी आरेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले….

Read More