पंचपरिवर्तनयुक्त भारताच्या उभारणीची गरज – श्रीधररावजी गाडगे
चिखली (जि. बुलढाणा), 2 जून कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संतुलन, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था निर्मिती आणि नागरिक शिष्टाचार व कर्तव्याचे पालन यातून आपणा सर्वांना पंचपरिवर्तनयुक्त भारताची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मा. प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी येथे केले. चिखली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत ‘संघ शिक्षा वर्ग (सामान्य)’च्या समारोप प्रसंगी ते बोलत…