
दुकानातील कॉम्प्रेसर सुरू करण्यासाठी गेलेल्या 48 वर्षीय इसमाचा शॉक लागून मृत्यू; मलकापूर शहरातील घटना
मलकापूर:- शहरातील चाळीसबिघा परिसरातील 48 वर्षीय इसमाला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 15 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की सुनील किसन ठोसर वय 48 वर्ष राहणार चाळीसबिघा यांचे पंचरचे दुकान असून आज सकाळी दुकानातील कॉम्प्रेसर सुरू करण्यासाठी गेले असता त्यानां इलेक्ट्रिक शॉक लागुन जागीच कोसळले….