Headlines

आज पासून विश्व हिंदू परिषद – बजरंग दल मोफत वैद्यकीय सेवा चिकित्सा सप्ताहला प्रारंभ.. गरजूंनी या सेवा कार्याचा लाभ घ्यावा – विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आव्हान

मलकापूर – मानव सेवा हीच ईश्वर सेवा स्त्री असो वा पुरुष, कितीही असो वय, कोणताही असो आजार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषध उपचार हे समाज सेवेचे ब्रीद घेवून दिनांक 27 जून ते 5 जुलै 2024 रोजी पर्यंत विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने वैद्यकीय चिकित्सा तपासणी सेवा सप्ताह चे आयोजित करण्यात…

Read More

वादळी वाऱ्यामुळे अंगावर भिंत पडून मृत पावलेल्या इसमाच्या पत्नीला तहसीलदार यांच्या हस्ते चार लाखांचा धनादेश वितरित, मलकापूर शहरातील समर्पण लॉन येथे घडली होती घटना

मलकापूर :- महिनाभरापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे समर्पण लॉन येथील भिंत कोसळून त्यात एका इसमाचा मृत्यू झाला होता. ( विशाल प्रल्हाद चोपडे )असे मृत इसमाचे नाव आहे. मंगल गेट परिसरात ते परिवारासह वास्तव्यास आहे.दि 26/05/2024 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे समर्पण लॉन येथे त्यांच्या अंगावर भीत पडून त्यांचा मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तहसीलदार मलकापूर यांच्याकडून…

Read More

मोताळा ते मलकापूर मार्गांवरील दुकान फोडून जुन्या पाण्याच्या मोटारी लंपास,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

मोताळा: तालुक्यातील शेलापूर येथील मोताळा ते मलकापूर मार्गावरील दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७० हजार रुपये किंमतीच्या ३० जुन्या वापरत्या पाण्याच्या मोटारी लंपास केल्याची घटना २१ जून रोजी सकाळी उघडकीस आली. प्रकरणी २५ जून रोजी बोराखेडी पोलीसात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील चिराग प्रकाश होले यांचे शेलापूर येथील बस थांब्याजवळ…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात कुकर घातला,खामगाव येथील घटना

खामगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रूपाली शिवाजी बाभूळकर वय (३०) यांनी पोस्टेला फिर्याददिली की ते जुनना येथे पतीसोबत राहतात. रविवारी त्या घरात स्वयंपाक करीत असतांना पतीने चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. कुकर डोक्यात मारून जखमी करून जिवे मारण्याची…

Read More

शेतकऱ्यांंच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी कृषी अधिकारी कार्यालयाला (उ.बा.ठा) शिवसेनेने ठोकला ताला

मलकापूर :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मलकापूर तालुका व शहरातील शेतकऱ्यांचे गेल्या वर्षभरापासून अनुदान रखडले असून ते अनुदान पाच दिवसात न दिल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला ठोकोचा इशारा मलकापुर शहर व तालुका (उ.बा.ठा)शिवसेनेच्या वतीने दि.20 जुन रोजी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता,पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला त्यावर निगरगट्ट कृषी अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई…

Read More

मलकापुरच्या युवकांचा मुक्ताईनगर उड्डाणंपुलावर अपघात,एक जागीच ठार तर एक सुदैवाने बचावला

मलकापूर:- ओव्हरटेक करत असतांना रोडवर पडलेल्या पाण्यामुळे दुचाकी स्लिप होऊन दुचाकी स्वार कंटेनरच्या खाली आल्याने कंटेनर चालकाने दूरपर्यंत फरफटत नेले यात एक जण जागीच ठार झाला तर एक जण सुदैवाने बचावला आहे ही घटना आज दि. 25 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील उडान पुलावर घडली. मृतक हा मलकापूर शहरातील स्थानिक रामदेवबाबा नगर…

Read More

खासगी बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही, लग्न आटपून बुलढाणा येत होते 48 वऱ्हाडी मंडळी, मेहकर फाट्यावरील घटना

चिखली : खासगी बसला आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना आज दि. 25 जून रोजी सकाळी चार वाजताच्या सुमारास चिखली शहराजवळ असलेल्या मेहकर फाट्यावर घडली असून या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र प्रवासी असलेल्या 48 वऱ्हाडांचे सामान जळून खाक झाले आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार वऱ्हाडी मंडळी चंद्रपूर येथून बुलडाणा येथे लग्न…

Read More

विहिरीत उडी घेऊन 26 वर्षीय तरुणाने संपवली जीवनयात्रा, जळगाव जामोद तालुक्यातील घटना

जळगाव जा : जळगाव जा.पोस्टे अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली ही घटना २३ जून रोजी उघडकीस आली याबाबत मयतचा भाऊ गणेश पवरे ४० वर्षे याने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला माहिती दिली की माझा भाऊ संतोष मधुकर पवरे वय वर्ष २६ याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली जळगाव जामोद…

Read More

लासुरा वरखेड फिडरचे मेंटेनन्स करा..संभाजी शिर्के यांनी खडसावत आंदोलनाचा इशारा देताच कर्मचारी रात्रीच लागले कामाला

मलकापूर :- गेल्या वीस ते पंचवीस दिवसा अगोदर झालेल्या वादळी पावसामुळे विद्युत पोल पडून वरखेड लासुरा शिवारातील अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. त्याची पुनः उभारणी करत वीज पुरवठा सुरू होऊन वीस दिवस उलटून गेले तरी मेन्टेनन्स अभावी थोडी जरी हवा पाणी सुरू झाले तरी लासुरा वरखेड शिवरात्री लाईट लगेच बंद होते. हा सपाटा गेले जवळजवळ…

Read More

डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी,मलकापूर येथील विद्यार्थ्यांची निकाला पूर्वीच नामांकित कंपनी मध्ये नेमणूक

मलकापूर :- डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी,मलकापूर येथील बी.फार्मच्या आठ विद्यार्थ्याची विविध नामांकित कंपन्यामध्ये विविध पदावर निवड झाली. त्यापैकी कु. सनोबर सय्यद या विद्यार्थिनीची नेमणूक टाटा कन्सल्टनसी नागपूर येथे फार्माकोविजीलांस असोसिएट या पदावर २.४० लक्ष वार्षिक वेतनावर नेमणूक देण्यात आलेली. कुणाल देशमुख या विद्यार्थ्याची IKS हेल्थकेअर,कोयाम्बतूर येथे मेडिकल scribe या पदावर ४.८० लक्ष वार्षिक वेतनावर…

Read More