Headlines

भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला उडवले,एकाचा जागीच मृत्यू

पिंपळगाव सराई : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत युवक जागीच ठार झाला. ही घटना २२ मे रोजी रात्री सोनेवाडी येथे घडली. देविदास गजानन काळे (रा. सोनेवाडी, वय २३) असे मृतक युवकाचे नाव आहे. सोनेवाडी येथील देविदास काळे व शुभम तायडे हे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सोनेवाडीजवळील सिमेंट रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, त्यांना भरधाव दुचाकी…

Read More

कर्जाच्या चिंतेतून 73 वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :कर्जाच्या चिंतेतून ७३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली ही घटना तालुक्यातील कदमापूर येथे २३ मे रोजी उघडकीस आली. नारायण मुकाजी गुरव यांनी २३ मे रोजी पहाटे घरासमोर टिनपत्राच्या लाकडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा…

Read More

पाइपलाइनच्या व शेतरस्त्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉडने हाणामारी, परस्पर तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल!

मोताळाः शेतरस्ता तथा पाण्याच्या पाइपलाइनच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि काठीने हाणामारी झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पोटा येथे घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा तालुक्यातील पोटा येथील रामेश्वर पुंडलिक सरोदे यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेआठ…

Read More

सर्पदंशाने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू,१५ दिवसांपूर्वी झाला होता विवाह

वरवट बकाल-  येथील रंगाचा व्यवसाय करणारे व्यापारी संदीप शेषराव तेटू (वय ३१ वर्ष) हे नेहमी प्रमाणे वरवट बकाल बस थांब्यावरील रंगांच्या दुकानात २२ मे रोजी सकाळी गेले असता त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. संदीप तेटू यांना प्रथम खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले….

Read More

मलकापूर उपविभागीय कार्यालयचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता अनिल ए. शेगांवकर यांनी एन.एस.सी.योजने मार्फत केलेल्या महाघोटाळ्याची चौकशी करण्यात यावी – कुणाल सावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

मलकापूर, जि. बुलढाणा विभागीय कार्यालया अंतर्गत मलकापूर विभागातील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता अनिल ए. शेगांवकर यांनी २०१९ ते २०२३ पर्यंत गरजू व आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटाकापर्यंत विज वाहीनी पोहचविण्यासाठी नविन विज जोडणी योजना (न्यु सर्व्हस कनेक्शन स्किम) एन.एस.सी. ही योजना महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये गोरगरीबांच्या कल्याणासाठी आणली होती. त्यावेळेसचे मलकापूर येथील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता श्री. अनिल ए….

Read More

मानव अधिकार रचनात्मक सेवा संस्थांच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी कुणाल सावळे यांची निवड

मलकापूर:- सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले कुणाल सुधीर सावळे यांची मानव अधिकार रचनात्मक सेवा संस्थांच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्राची आवड असलेले कुणाल सुधीर सावळे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यांच्या कडून सहा महिन्यात मानव अधिकार रचनात्मक सेवा संस्थांनंचे नाव उज्वल करण्यासाठी मोठे योगदानाची अपेक्षा संस्थानकडून ठेवण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व…

Read More

न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या महिलेने चक्क मलकापूर शहर पोलीस निरीक्षकांचीच आरती ओवाळण्याचा केला प्रयत्न..

मलकापूर:- शहरातील एका प्रख्यात डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने आपल्या मुलाचा पाय कायमचा जायबंदी झाल्याचा आरोप करत या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मलकापूर शहरातील एका महिलेने केली होती. मात्र एक महिना होऊनही पोलिसांनी कुठलीही कारवाई या डॉक्टर विरोधात केली नसल्याने आणि गुन्हाही नोंदवला नसल्याने या पीडित महिलेने चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन त्यांची आरती केली. काल…

Read More

बाजार समिती सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव; 14 संचालकांचे जिल्हाधिकारी यांना पत्र

मलकापूर : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरुद्ध सहकारी संचालक मंडळातील १६ संचालकांपैकी १४ संचालकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे आज २१ मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केल्याने राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. गतवर्षीच मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपा नेते चैनसुख संचेती…

Read More

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चार संशयित चोरट्या महिलांना दुसरबीड येथील बाजारातून अटक !

बुलढाणा: प्रतिनिधी :- सचिन खंडारे सिंदखेड राजा तालुक्यातील अतिशय महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसरबीड गावामध्ये दर मंगळवार ला आठवडी बाजार भरत असतो दुसरबीड गावाशी जवळपास ३० ते ३५ खेड्यांचा संपर्क येत असून मंगळवार २१ मे हा बाजाराचा दिवस असल्यामुळे सहाजिकच आठवडी बाजारात गर्दी नेहमीप्रमाणे झाली होती,याच गर्दीचा फायदा घेऊन चार अनोळखी महिला ह्या गर्दीत…

Read More

मलकापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ,दोन घरे फोडले, दाग दागिन्यांसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

मलकापूर :- घराचा कडी कोंडा तोडून डाग दागिने व रोख रक्कम असा एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.18 मे ते 20 मे दरम्यान शहरातील मधुवन नगर येथे घडली. याप्रकरणी ( रीना सुरवाडे वय 24 )रा. मधुबन नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी तक्रारी म्हटले आहे कि…

Read More