
डोक्यावर कर्ज, पुढे मुलीचे लग्न, या चिंतेतून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; खामगाव तालुक्यातील घटना
खामगाव (प्रतिनिधी): मुलीच्या लग्नाच्या खर्चाची व कर्जाच्या भाराची चिंता सहन न झाल्याने अंत्रज येथील शेतकरी सहदेव किसन कोकाटे (वय ५१) यांनी २८ डिसेंबर रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही साखळी अद्याप थांबलेली नाही. अनुदानासाठी जाचक अटींमुळे…