पंतप्रधान आवास योजनेतून आणखी तीन कोटी घरे मिळणार,केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सत्तारूढ होताच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारने दहा वर्षांत राबविलेली पंतप्रधान आवास योजना अत्यंत लोकप्रिय ठरली. यापुढे या योजनेखाली आणखी 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय आज, 10 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक…