किरकोळ वादातून चाकूहल्ला, दोघे गंभीर जखमी; खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील घटना!
खामगाव: किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चाकूहल्ल्याची गंभीर घटना शेलोडी (ता. खामगाव) येथे सोमवारी रात्री ९:३० वाजता घडली. या हल्ल्यात एका वृद्धासह त्याच्या मुलालाही गंभीर जखमी करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर विश्वनाथ गाडे (३७) यांच्या काका रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा पवन दशरथ बानाईत याच्यासोबत पूर्वी किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर पवन…
